शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…अन्यथा स्वबळाची परिपुर्ण तयारी; भुजबळांचा सेना, काँग्रेसला इशारा

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2022 | 8:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220204 WA0012

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर झाल्या असून लवकरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीस सुरवात केली आहे. त्यानुसार सर्वांची मते जाणून घेण्यात येत असून सन्मानपूर्वक आघाडीस प्राधान्य देण्यात आहे. मात्र आघाडी न झाल्यास स्वबळावर सर्व जागा लढण्याची देखील तयारी करण्यात येत असे सांगत देशभरात भाजपची हवा आता ओसरली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी पार्टीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी भवन नाशिक येथील कार्यालयात आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. आगामी निवडणुका लढताना भाजप वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. मात्र सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत असून प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, आपल्या कामकाजामुळे भाजपची हवा देशपातळीवरच कमी झालेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये देखील जागृती असून शहरात देखील पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नागरिकांची पसंती असून पक्षाची शहरात ताकद देखील अधिक वाढली आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्यात येत असून अधिक गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी विभागानुसार नेमण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रभाग रचना जाहीर झाली असून त्याचा सूक्ष्म अभ्यास करून माहिती गोळा करण्यात यावी. आघाडी होवो ना होवो संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करावी. विभागवार जबाबदारी घेऊन निवडणुकीचे कामकाज करण्यात यावे. पक्ष अतिशय मजबुतीने उभा असून पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, महापालिका गटनेते गजानन शेलार, डॉ.शेफाली भुजबळ, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, शिवाजी सहाणे, नगरसेविका सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, सुफी जीन, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय निकाळे, सरचिटणीस संजय खैरनार, प्रांतिक सदस्य महेश भामरे, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, जीवन रायते, मुजाहित शेख, बाळसाहेब गिते, माजी मनपा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सुरेखा निमसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता फास्ट टॅगही जाणार आणि हे येणार; वेळेचीही होणार बचत

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post
carona

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011