नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याने त्याचा बदला आम्ही घेतला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. याच वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बदला घेण्याच्या भावनेने कोणीच वागू नये. आपली संस्कृती वेगळी आहे, हे तुम्हीच सांगतात ती जपा. इतर काही राज्यात बदल्याचे राजकारण झाले, मात्र त्यापेक्षा वाईट राज्यात सुरू आहे. आपल्या राज्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे. ती सर्वांनीच जपायला हवी, असे भुजबळांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना भेटत नसल्याबद्दल भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मला सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे. पण भेटायचं म्हटलं की, कसं भेटायचं तेच कळत नाही. फोनवर संपर्क होत नाही. कार्यालयात कधी बसतात ते कळत नाही. आमदार, विरोधी पक्ष नेते यांच्यासाठी पण वेगळा वेळ त्यांनी ठेवायला हवा, अशी मागणी भुजबळांनी केली.
खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर भुजबळ म्हणाले की, गजानन किर्तीकर यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी खूप विश्वास ठेवला. त्यांनी शिवसेनेसाठी खूप काम केलं आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण ठीक आहे. त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असेल तर शुभेच्छा.
NCP Chhagan Bhujbal on Devendra Fadanvis
Politics Culture