नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागासवर्गीय समाजातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि विविध विभागाचे मंत्री म्हणून धुरा सांभाळली आहे. तसेच, त्यांच्या रुपाने पुन्हा एकदा नाशिकला आणखी एक मंत्रीपद मिळाले आहे. सध्या दादा भुसे हे मंत्रिमंडळात होते. आता त्यात भुजबळांची भर पडली आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊया भुजबळांच्या वाटचालीविषयी….
श्री. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.
१९९९ साली श्री. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष. आजवर पक्षासाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान देत आले आहेत. त्याच प्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेत देखील ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत.
जन्म – १५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतला.
१९७३ मुंबई महापालिकेवर निवड. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर. १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर.
मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम. वांद्रे – मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
१९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
२००९ मध्ये दुसऱ्यादा तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवड.
१९९९ साली श्री. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
1980 आणि 1986 मध्ये श्री.भुजबळ यांनी व्यापक परदेशी दौरा केला. त्यांनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, स्वित्झरलँड आणि रशिया या देशांना भेटी दिल्या.
महापौर असताना त्यांनी 1990 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच ओसाका, जपान येथे 1990 साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासह ते सहभागी झाले.
ऑक्टोबर 2000 मध्ये श्री.भुजबळ यांनी फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने 28 मे ते 18 जून, 2001 या काळात न्यूयॉर्क, जिनीव्हा, लंडन या शहरांचा दौरा केला.
2002 या वर्षी केंद्रीय पर्यटन तसेच नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी मध्य पूर्वेतील तसेच पश्चिम आशियाई देशातील पर्यटकांना भारतात आकृष्ट करण्यासाठी नेलेल्या शिष्टमंडळात श्री.भुजबळ यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार श्री.भुजबळ यांनी दि.19 मे ते 24 मे, 2002 या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी या देशांचा दौरा करुन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर श्री.भुजबळ यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2002 या कालावधीत अमेरिका,कॅनडा आणि युनायटेड किंगडम या देशांना भेटी दिल्या. तसेच 6 ते 14 नोव्हेंबर,2002 या कालावधीत लंडन येथे भरलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट या जागतिक पर्यटन विषयक प्रदर्शनास भेट देण्यासाठी व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची या प्रदर्शनामार्फत जागतिक पातळीवर प्रसिध्दी करण्यासाठी त्यांनी लंडनला भेट दिली.
भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची छगन भुजबळ यांनी दि. 5 नोव्हेंबर, 2010 रोजी मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांना महात्मा ज्योतीराव फुले यांनी लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवाद ग्रंथ भेट दिला. त्या काळात अद्ययावत माहिती देणारी प्रसारमाध्यमे किंवा साधनसामग्री नसतानाही महात्मा फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील अफ्रो-अमेरिकन जनतेच्या लढयाला अर्पण केल्याची बाब श्री. भुजबळ यांनी श्री. ओबामा यांना सांगितली. त्यावेळी स्वत: ओबामा सुध्दा काही क्षण अवाक झाले आणि ‘इट इज अ ग्रेट-ग्रेट गिफ्ट फॉर मी’ अशा शब्दांत श्री. भुजबळ यांचे आभार मानले. अमेरिकेत परतल्यानंतर श्री. ओबामा यांनी श्री. भुजबळ यांना प्रतिभेटीदाखल एक स्वाक्षांकित चांदीचा ग्लास पाठविला.
दि. 11 नोव्हेंबर, 2010 रोजी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली. या फेररचनेमध्ये श्री. भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाच्या मंत्री पदाचा कार्यभार कायम ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारीही सोपविण्यात आली.
सन २००९ मध्ये दुसर्यांदा तर ऑक्टोबर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा येवला मतदारसंघातून आमदार म्हणून निवड
ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा येवला मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि.२८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
दि.१ नोव्हेंबर १९९२ साली संस्थापक अध्यक्ष मा.श्री.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची स्थापना करण्यात आली.
समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना येथे झाला. या मेळाव्यात अध्यक्षपदी मा.श्री.शरद पवार, प्रमुख पाहुणे तत्कालीन समाजकल्याण मंत्री सिताराम केसरी, मा.श्री.छगन भुजबळ, महाराष्ट्रातील तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले,मंत्री मा.श्री.शिवाजीराव शेंडगे, मा.श्री.मधुकर पिचड यांच्यासह देशातील विविध मान्यवरांसह सुमारे २ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
दि.६ जून १९९३ जालना येथे झालेल्या या मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून मा.श्री.शरद पवार यांच्या कडे लागू करण्यासाठी मागणी करण्यात आली.
त्यानंतर १९९४ साली मा.श्री.शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला.
मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा १९९४ साली अमरावती, महाराष्ट्र येथे मा.श्री.शरद पवार, तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री मुकुल वासनिक, श्री.छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल मा.श्री.शरद पवार यांचे आभार मानले.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली.
त्यानंतर जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या त्यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सदस्यांनी मराठवाड्यातील गावांगावात जाऊन जातीय सालाखो निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. त्यात समता परिषदेला यश देखील मिळाले.
सन १९९५ साली युतीची सत्ता असतांना पुणे येथे बाबुराव सनस मैदानावर मेळावा घेण्यात या मेळाव्यात अध्यक्षपदी मा.श्री.शरद पवार, मा.श्री. दिलीप वळसे पाटील, मा.श्री.छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर सालात नागपूर येथे समता परिषदेने मेळावे घेतला. या मेळाव्यात मा.श्री.शरद पवार यांनी राज्यपातळीबरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्यावे असे सांगितले.
त्यानंतर लगेचच २००५ मध्ये रामलीला मैदान दिल्ली येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थामध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या मेळाव्यास मा.श्री.शरद पवार, मा.श्री.लालू प्रसाद यादव, मा.श्री. शरद यादव, मा.श्री,छगन भुजबळ यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच ५ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
सन २००६ मध्ये बिहार येथे गांधी मैदान येथे तत्कालीन मंत्री उपेंद्र कुशवाह, मा.श्री.छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास ७ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
सन २००८ मध्ये राजस्थान, जयपूर येथील विद्याधर स्टेडियम येथे कृषी मंत्री प्रभुलाल सैनी, मा.श्री.छगन भुजबळ यांच्या उपस्थित मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ३ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
सन २००६ साली मा.श्री.छगन भुजबळ यांच्या उपस्थित गोवा येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास ६० हजारांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
हैद्राबाद मेळावा
सन २०११मध्ये ‘हजारीबाग झारखंड’ येथे मेळावा घेण्यात याला. या मेळाव्यास २ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
५ जानेवारी २०१५ मध्ये मध्यप्रदेश ‘सतना’ येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास मा.श्री.छगन भुजबळ, मा.श्री.उपेंद्र कुशवाह, खासदार राजकुमार सैनी, मा.श्री. स्वामी प्रसाद मोर्य यांच्यासह १ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.
सन २०१६ मध्ये ‘दतिया’ मध्यप्रदेश येथे मेळावा घेण्यात आला.
सुरवातीस समता परिषद व नामांतर झाल्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद गेल्या २५ वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून गेल्या १४ वर्षापासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवीत येत आहे. त्यात बाळकृष्ण रेणगे,रावसाहेब कसबे,मा.गो.माळी,डॉ.तात्याराव लहाने,फादर फ्रान्सिस दिब्रेटो,श्री. वीरप्पा मोईली, श्रीमती अरुंधती रॉय, श्री. कुमार केतकर,श्री. शरद यादव, श्री. भालचंद्र नेमाडे, श्री.हरी नरके, श्री.उत्तम कांबळे, श्री. भालचंद्र मुणगेकर, श्री.शरद पवार यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
अखिल भारतीय समता परिषद देशभरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, झारखंड, उत्तरांखंड, बिहार, नवी दिल्ली, हरियाना, पंजाब,कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश येथे सामजिक कार्य करत आहे.
त्यात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, बिहार, या राज्यात लाखोंच्या संख्येने समता सदस्य सक्रीय आहेत.
समता परिषदेचे मुख्य काम
महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
पुणे येथे महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सन २००४ साली शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले वाडा,पुणे येथे महात्मा फुलेंना अभिवादन करून समता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित असतात.
सन २००४ पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगांव,जि.सातारा मेळावा घेण्यात येतो. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित असतात.
दिल्ली येथे संसदेच्या परिसरात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न.
केंद्रीय शाळा व नोकऱ्या मध्ये ओबीसींना आरक्षण.
ओबीसी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती.
मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी पाठपुरावा.
पुणे विद्यापीठाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव.
दि.१ फेब्रुवारी २०१६ रोजी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अमेरिकन काँग्रेसने (संसदेने) सामाजिक न्याय व शैक्षणिक सहकार्य या विषयासाठी आमंत्रित
कथित महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून(ईडी) दि. १४ मार्च २०१६ रोजी चौकशीसाठी बोलविण्यात येऊन अटक करण्यात आली.
दि.३ ऑक्टोबर २०१६ रोजी भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात नाशिक शहरात लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला.
दि.२ जानेवारी २०१८ रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय याठिकाणी भुजबळ समर्थकांकडून निदर्शने करण्यात आली.
दि.२३ जानेवारी २०१८ रोजी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ इंदापूरमध्ये भुजबळ समर्थकांनी भव्य मोर्चा काढला. तसेच पुणे सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं.
दि.२६ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये भुजबळ कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निषेधाचे ठराव करत भुजबळांना समर्थन.
दि.२९ जानेवारी २०१८ रोजी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
दि.४ मे २०१८ रोजी उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला.
रविवार दि.६ मे २०१८ रोजी छगन भुजबळ यांची कारागृहातून मुक्तता.
दि.१७ जुलै २०१८ रोजी संविधान बचाव रॅली नागपूर येथे उपस्थिती.
दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजी नाशिक येथे संविधान बचाव रॅली येथे उपस्थिती.
दि.१२ सप्टेंबर २०१८ रोजी मुस्लीम ओबीसी संमेलन मुंबई येथे उपस्थिती.
दि.१६ सप्टेंबर २०१८ रोजी पाचोरा जळगाव येथे समता परिषदेची सभा.
दि.२९ सप्टेंबर २०१८ रोजी बीड येथे अखिल भारतीय समता परिषद मेळावा.
दि.३१ ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीगोंदा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सभा.
दि. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी शहादा व सोनगीर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सभा.
दि.१५ डिसेंबर सोलापूर सांगोला येथे समता परिषदेची सभा.
दि.२४ डिसेंबर २०१८ रोजी वैजापूर येथे समता परिषदेची सभा.
दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त केले.