मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधी देवेन भारती आता श्रीकांत भारतीय.. फडणवीस यांच्या मर्जीतले लोक ठरत आहेत खरे लाभार्थी… अशा आशयाची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. आयपीएस अधिकारी देवेन भारतीय यांना मुंबईचे विशेष पोलिस करण्यात आले आहे. तर आता फडणवीस यांच्या मर्जीतले आणि भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण संस्थेबाबत राज्य सरकारने करार केला आहे. ही संस्था आता संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी करणार आहे. यावरुन राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात १९८० पासून असलेल्या संजय गांधी निराधार योजना मागील सरकारच्या कार्यकाळातपर्यंत योजनेत कोणताही बदल न होता यशस्वीपणे सुरू होती. मग, या संस्थेची आवश्यकता कशासाठी असा प्रश्नही राष्ट्रवादीने यानिमित्ताने विचारला आहे. तसेच, एक व्हिडिओही राष्ट्रवादीने ट्विट केला आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1613448883337826305?s=20&t=-8olaox3834YDrd60ZKaTw
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अनाथांपर्यंत पोहोचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन शासनाकडून कोणतेही अनुदान वा आर्थिक लाभ घेणार नसून, केवळ सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन संस्था काम करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे. दि. १० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती अनाथांना देणे व योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे यासाठी तर्पण फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेसोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग यांनी त्रिपक्षीय करारनामा करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अनाथांपर्यंत पोहोचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन शासनाकडून कोणतेही अनुदान वा आर्थिक लाभ घेणार नसून, केवळ सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन संस्था काम करणार आहे. या संस्थेसोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग यांचेमार्फत त्रिपक्षीय करारनामा होणार असून सदर करारनामा प्रथम ८ वर्षाकरीता असेल. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतील. संस्थेचे काम समाधानकारक असल्यास पुढील ७ वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ देऊ शकतील, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
https://twitter.com/ShreeBharatiya/status/1612786507269705729?s=20&t=-8olaox3834YDrd60ZKaTw
NCP Allegation on BJP Devendra Fadnavis Politics