मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॅशिंग पर्सनालिटीसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दबंग वागणे मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यावर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका केला. यावेळी अजित पवार यांनी सर्वांसमोर बहिणीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना झापलं.
शरद पवार यांनी राजीनामा देत असल्याचा निर्णय भाषणातून जाहीर केला. ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांना सभागृहातच कार्यकर्ते आणि पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांनी घोळका घातला. सर्वांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करत होते. कुणी रडत होते कुणी भावूक झाले होते.
यादरम्यान कुणीतरी सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. पण त्याचवेळी अजितदादांनी माीक हाती घेतला आणि ‘सुप्रिया तू बोलू नकोस. मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय’ असे म्हटले. रागवण्याच्या स्वरात बोलल्यामुळे अजितदादांची एवढीच क्लिप चांगलीच व्हायरल झाली. तत्पूर्वी, त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन केले. वयामुळे कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात, असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते आणि नेते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही झापलं.
https://twitter.com/SaamanaOnline/status/1653335460784275456?s=20
सारे तसेच राहणार
अजित पवार यांनी शरद पवार यांच्याच छत्रछायेत राष्ट्रवादीचे कामकाज चालणार असल्याचे सांगितले. ‘शरद पवार यांनी पद सोडलं म्हणून ते बाजुला राहतील, असा गैरसमज करून घेऊ नका. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाईल. ते नेतृत्व शरद पवार यांच्या तालमीत तयार होईल,’ असे ते म्हणाले. बाकी देशभर फिरणं, लोकांना भेटणं, बैठका घेणं सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःपासून भाकरी फिरवली
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे म्हटले होते. याचे अनेक अर्थ लावले गेले. पण ते स्वतःपासून भाकरी फिरवतील, असा विचार कुणीही केला नव्हता. एरवी ते सर्वांना एकत्र बसवून निर्णय घेतात. पण हा निर्णय त्यांनी स्वतःच घेतला आणि जाहीर केला, त्यामुळे आम्हालाही धक्का बसला आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली,
नवीन अध्यक्षाला अडचण काय?
अजित पवार कार्यकर्ते आणि नेत्यांना झापण्याच्या स्वरात बोलत होते. नवीन अध्यक्ष नको, पवार साहेबच अध्यक्ष राहिले पाहिजे, अश्या घोषणा कार्यकर्ते देत होते. त्यावर बोलताना अजितदादांनी नवीन अध्यक्षाला अडचण काय आहे, असा सवाल केला. त्यावेळी वरच्या पट्टीतील त्यांचा स्वर अनेकांसाठी धक्कादायक होता.
https://twitter.com/zee24taasnews/status/1653405949372280832?s=20
NCP Ajit Pawar Politics Supriya Sule Meeting