मुंबई – क्रूझ ड्रग पार्टी आणि अमली पदार्थ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ला मिळालेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खान सध्या गेल्या १८ दिवसांपासून तुरुंगात आहे. आर्यनसह त्याच्या मित्रांचे व्हॉटसअॅप चॅट, मोबाईल कॉल्स यासह विविध बाबी पडताळून पाहिल्यानंतर आता एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेकडे मोर्चा वळविला आहे. आर्यनच्या चॅटमध्ये अनन्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच एनसीबीच्या पथकाने आज दुपारी पांडेच्या घरी छापा टाकला आहे. एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलविले आहे. तिची कसून चौकशी होणार असून ड्रग्ज खरेदी-विक्रीचे संपूर्ण रॅकेटच उद्धवस्त करण्याचा चंग एनसीबीने बांधला आहे. दरम्यान, अभिनेता शाहरुख खान आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. कारण, यापूर्वीच पुत्र आर्यन हा तुरुंगात आहे. आता एनसीबीचा रोख शाहरुख कन्या सुहाना हिच्याकडे वळण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या चॅटमध्ये सुहानाचेही नाव असल्याचे समोर आले आहे. तसे असेल तर सुहाना खानचीही चौकशी होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी तिला एनसीबीच्या कार्यालयात यावे लागणार आहे. भक्कम पुरावा असेल तर आर्यन आणि सुहाना यांंच्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी प्रचंड वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
Mumbai | A team of Narcotics Control Bureau arrives at the residence of actor Ananya Pandey. A team of NCB is also present at Shah Rukh Khan's residence
Visuals from Ananya Pandey's residence pic.twitter.com/U5ssrIxpph
— ANI (@ANI) October 21, 2021