मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांनी आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितली आणि १८ कोटी रुपयांवर डील निश्चित झालेली होती, असा आरोप आहे. या आरोपानंतर वानखेडे आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत एका प्रश्नाचे वानखेडे यांच्याकडे उत्तरच नव्हते. त्यांनी मौन बाळगले की त्यांना माहितीच नव्हते, हे आता हळूहळू उलगडत आहे.
समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर छापेमारीही केली आहे. ज्यावेळी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने छापेमारी केली होती त्यावेळी बरेच काही घडले. या छापेमारीचा घटनाक्रम अत्यंत धक्कादायक असून त्यातील प्रत्येक टप्पा चौकशीदरम्यान सीबीआयच्या हाती लागत आहे. या छापेमारीनंतर महागड्या वस्तूंची यादी पथकाने तयार केली. त्यात ३० लाख रुपये किंमतीचे रॉलेक्स कंपनीचे घड्याळही सामील होते.
महागड्या घड्याळाच्या खरेदी आणि विक्री प्रकरणात एनसीबीच्या व्हिजिलन्स पथकाने समीर वानखेडे यांनी चौकशी केली. पण हे घड्याळ पथकाकडे कसे आले, या प्रश्नाचे उत्तर वानखेडे यांना देता आले नाही. वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणीप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे, हे विशेष. वानखेडेंच्या पथकाने ड्रग्स प्रकरणात ज्यांना अटक केली.
त्यातील एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी याने ते घड्याळ आपले असल्याचे सांगितले आहे. ‘ ‘मला अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने माझे ३० लाख रुपये किमतीचे घड्याळ काढून घेतले. त्यानंतर जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत हे घड्याळ नमूद करण्यात आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी आशिष रंजन होते,’ असे सजनानी याने सांगितले आहे.
सासऱ्याने दिलेले घड्याळ
समीर वानखेडे यांच्या पथकाने छापेमारीदरम्यान ३० लाखांचे घड्याळ चोरले, असा आरोप करण सजनानी याने केला आहे. संबंधित घड्याळ रोलेक्स कंपनीचं असून माझ्या सासऱ्याने लग्नात भेट दिले होते, असेही सजनानी याने म्हटले आहे.
१२५ किलो नव्हे साडेसात ग्राम
समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने करण सजनानीला १२५ किलो गांजा आयात केल्याच्या आरोपात अटक केली होती. पण जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये केवळ साडेसात ग्रॅम गांजा होता. इतर वस्तूंमध्ये सुगंधी तंबाखू होती, असा दावा सजनानी याने केला आहे.
NCB Officer Sameer Wankhede 30 Lakh Watch CBI