मुंबई – समुद्र क्रूझवर ड्रग्ज पार्टीत सापडलेले आर्यन खान यांच्यासह ८ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र असलेल्या आर्यनसह त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि अन्य ८ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे आर्यनसह कोठडीत असलेल्यांचा जामीनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या (८ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. तसेच, यापुढे ड्रग्ज प्रकरणाची सुनावणी आता विशेष न्यायालयात केली जाणार आहे. आर्यनसह आठ जणांना न्यायालयाने एनसीबी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ही कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1446105704075386887