मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना येत्या ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या निर्णयानंतर न्यायालयाबाहेर येत मलिक यांनी समर्थकांना हम लढेंगे असा संदेश दिला आहे. तसेच, मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. मलिक यांनी म्हटले आहे की, कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आएगा.. तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा… मलिक यांनी त्यांच्या प्रतिक्रीयेतून अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. थोड्या कालावधीसाठी तुम्हाला ही संधी मिळाली आहे, मात्र, आगामी काळ आमचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1496507350467104769?s=20&t=4HrRVsWEpG_ffB7qwcI_YQ