मुंबई – क्रूझ ड्रग प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पेशल २६चा खुलासा केला आहे. मलिक म्हणाले की, वानखेडे यांनी आतापर्यंत तब्बल १ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची वसुली केली आहे. तसेच, मी सादर केलेले त्यांचे जन्म प्रमाणपत्र खोटे असेल तर त्यांनी त्यांचे खरे जन्म प्रमाणपत्र सर्वांसमोर सादर करावे, असे आव्हानही मलिक यांनी दिले आहे.
मलिक पुढे म्हणाले की, वानखेडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केली आहे. खोटे जात प्रमाणपत्र देऊन त्यांनी नोकरी मिळविली आहे. ज्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यांनीच मला पुरावे दिले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये वानखेडे यांनी अयोग्य काम केले आहे. वानखेडे यांच्या विविध २६ केसेस मलिक यांनी आज सार केल्या. या केसेसमध्ये विनाकारण काही जणांना अडकविण्यात आले आहे. त्याची यात माहिती आहे. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिले आहेत. तसेच, एनसीबीचे जे पथक वानखेडे यांची चौकशी करीत आहे. त्यांना सुद्धा हे सर्व पुरावे दिले जाणार आहेत. एनसीबीच्या महासंचालकांनाही ते पाठविले जातील, या सर्व २६ प्रकरणांची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी आग्रही मागणी मलिक यांनी केली. बघा, मलिक यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=466952464639032