मुंबई – कोरोनाच्या गंभीर संकटातही भारतीय जनता पक्ष स्वार्थाची पोळी भाजून घाणेरडे राजकारण करीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. असे असताना गुजरातमधील सूरत येथे भाजप कार्यालयात हे इंजेक्शन मोफत दिले जात आहे. हे राजकारण नाही तर काय आहे, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. आपत्तीच्या काळात ज्या औषधाची सर्वत्र मागणी होत आहे ते भाजपला कसे काय मिळते आणि पक्षाच्या कार्यालयात ते मोफत देण्याची योजना कशी सूचचे शकते, हे सारेच गंभीर आहे, असा सवालही मलिक यांनी उपस्थित करीत भाजपवर तोंडसुख घेतले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1381086082259816451
https://twitter.com/ANI/status/1381014992854519808