मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाल मलिक यांनी आज पुन्हा एक गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या पदाचा सातत्याने दुरुपयोग केला आहे, असे सांगत मलिक यांनी आज आणखी दोन घटनांचा उल्लेख केला. एका आयपीएस अधिकाऱ्याशी वानखेडे यांचा वाद झाल्याने त्याच्या मुलालाही वानखेडे यांनी ड्रगच्या प्रकरणात अडकवले. प्रत्यक्षात त्या मुलाकडे ड्रग्ज सापडले नाही. तसेच, वानखेडे यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला. या पत्नीने आपल्याविषयी कुठलीही तक्रार करु नये यासाठी पत्नीच्या चुलत भावाला ड्रग पेडलरच्या माध्यमातून तुरुंगात टाकले आहे. आजही तो भाऊ तुरुंगातच असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. वानखेडे यांचे हे कारनामे अनेक असून त्याचा भांडाफोड करीतच राहणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. बघा मलिक यांचा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1461264281849139200