मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेलशी नक्की काय संबंध आहे. तीन प्रकरणांमध्ये फ्लेचर पटेल पंच कसा आहे, जर तो फॅमिली फ्रेंड असेल तर त्याला पंच म्हणून घेणार का, असा घाणाघाती सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे सर्व प्रकरण अतिशय अपारदर्शी असून यासंदर्भात मलिक यांनी वारंवार विविध दावे आणि आरोप केले आहे. त्याची दखल घेत एनसीबीलाही वारंवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडावी लागत आहे. आता या गंभीर आरोपाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा हा व्हिडिओ – मलिक काय म्हणत आहेत
https://twitter.com/NCPspeaks/status/1449303041237139460