मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सध्या दुबईमध्ये असले तरी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना सोडलेले नाही. मलिक यांनी आज सकाळीच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मलिक यांनी एक ट्विट करुन दोन कागदपत्रे जगजाहीर केली आहेत.
वानखेडे यांनी दोन वेगवेगळी कागदपत्रे सादर केल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या दफ्तरी असलेली ही दोन्ही कागदपत्र आहेत. वानखेडे यांच्या आईंच्या मृत्यू नोंदणीमध्ये त्यांचा धर्म मुस्लिम म्हटला आहे. तर, त्यांच्या मृत्यू अहवालात हिंदू धर्म अशी नोंद करण्यात आली आहे. हे दर्शवतानाच मलिक यांनी आणखी एक फर्जीवाडा आणि धन्य है दाऊद ज्ञानदेव असे म्हटले आहे. त्यामुळे ही बाब विशेष चर्चेची ठरली आहे.
यापूर्वीही मलिक यांनी वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. वानखेडे हे मुस्लिम असले तरी त्यांनी अनुसुचित जातीसाठीच्या आरक्षणातून नोकरी मिळविल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांचा संपूर्ण कारभार बोगस आहे. अनेक निष्पाप व्यक्तींचा मागे लागणे हा त्यांचा धंदा असल्याचेही मलिक यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
वानखेडे यांनी आज सादर केलेली कागदपत्रे अशी