मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी आणखी एक पत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण वाटते तेवढे सोपे आणि सरळ नाही. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे किडनॅपिंग करुन शाहरुख कडून बक्कळ खंडणी वसूल करण्याचे हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले की, कोर्टातही हे वारंवार सिद्ध झाले की, आर्यनला प्रतिक गाभा आणि अमीर फर्नीचरवाला यांनीच पार्टीमध्ये आणले. म्हणजेच आर्यनचे अपहरण करायचे आणि पैसे कमवायचा उद्देश होता. या सर्व प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड हा मोहित कंबोज हा आहे. कंबोज हा हॉटेल व्यावसायिक आहे. शेजारच्या हॉटेलवर छापेमारी झाली तर आफले हॉटेल जोात चालेल या उद्देशाने तो अनेक कारवाया करतो. या सर्व बाबीत समीर वानखेडे हरप्रकारे मदत करतो. जोपर्यंत वानखेडेची नोकरी जात नाही तोपर्यंत अनेक पुरावे आणि आरोप करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मलिक यांनी नक्की काय आरोप केले बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/nawabmalikncp/status/1457205343147020297?s=20









