मुंबई – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरू होते. यापैकीच एक ड्रग पेडलरने अमृता फडणवीस यांच्या गाण्यासाठी पैसे पुरवले होते, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी आज केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठीच खळबळ उडली आहे. मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांनी आता लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीनंतर मी सुतळी बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर, अमृता फडणवीस यांनीही मलिक यांच्याबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विनाशकाले विपरीत बुद्धी. या आरोप प्रत्यारोपांमुळे दिवाळीच्या सणातही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बघा, मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://www.facebook.com/NawabMalikOfficial/videos/2005675299607862/?extid=NS-UNK-UNK-UNK-IOS_GK0T-GK1C
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी मलिक हे दिवसेंदिवस विविध प्रकारचे गौप्यस्फोट करीत आहेत. त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करीत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान या प्रकरणात सहभागी आहे. तर, या सर्व प्रकरणाची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत.
चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ?
कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते !— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 1, 2021