मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवनीन गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी विविध आरोप केले आहेत. त्याचे पुरावे आपल्याकडे आहे. वानखेडे यांच्या विरोधात एकूण २६ केसेस असून त्याचे पुरावे देण्यासाठी आणि या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने चौकशी करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्याची तत्काळ दखल घ्यावी, अशी विनंती केल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. बघा, व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1453005272872542219