– प्रफुल्ल संचेती, जयंत गायधनी (नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक)
माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सदस्यांनी माझ्याकडे संपर्कच केला नाही असा चुकीचा आरोप केला आहे.
जर आम्ही संपर्कच केला नाही असं त्याचं म्हणणं असेल तर दिनांक ५ मार्च पासून आम्ही आवश्यक कागदपत्रांची फाईल जमा केली होती. त्यांनंतर आयुक्तांनी वेळ दिल्यानंतरच २५ तारखेला दुपारी १२ वाजता आम्ही पोलीस आयुक्तालयात पोहोचलो, आयुक्तालयातील माननीय भुसारे साहेब व चौधरी साहेब यांच्याकडे आम्ही दोन ते अडीच तास बसलो. त्यानंतर त्यांच्या सुचने नुसार पुहा ५ वाजता आयुक्तालयात आलो.
पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास बाहेरच्या सोफ्यावर आम्ही किती तास बसून होतो याची तुम्हाला खात्री पटेल. ३ तास तिथे बसून राहिल्यानंतर साडेआठ वाजता संबंधित पोलीस महिला अधिकारी यांच्याकडे आयुक्त साहेबांच्या वेळेबाबत चौकशी केली असता त्यांनी आज तुम्हाला वेळ दिलेली नाही असे सांगून उद्या या असे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही पोलीस आयुक्तालयात गेलो, सोबत माननीय खासदार हेमंत गोडसे यांचे स्वीय सहाय्यक माननीय मंडलिक हे देखील होते. त्यांनी देखील परवानगीसाठी आमच्यासोबत प्रयत्न केले, तेव्हा ते देखील दोन तास आमच्यासोबत बसून होते. तरी देखील आपल्यामार्फत परवानगी दिली गेली नाही, त्यादिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली.त्यानंतर आम्ही माननीय पालकमंत्री भुजबळ साहेब यान देखील फोन केला.त्यांनी आम्हाला सूचना दिली कि तुम्ही कार्यक्रम रद्द करू नका, तुम्हाला परवानगीची व्यवस्था केलेली आहे. मग आम्हाला आयुक्त कार्यालयातून फोन येतो कि २८ तारखेला आयुक्त साहेबांनी भेटायला बोलावलं आहे. जर हे सर्व कार्यक्रम २९ तारखेपासून सुरु होत आहेत तर २८ तारखेला भेट घेण्याला अर्थच काय ?
हे म्हणजेच एक प्रकारे परवानगी द्यायला चाल-ढकल करण्यासारखे आहे.
आम्ही आजवर फक्त विनंतीच्या सुरातच परवानगीची मागणी केलेली आहे. उद्या या, परवा या, अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी टाळटाळ केली गेली याची माननीय आयुक्त साहेबांनी चौकशी करावी.
स्वागत यात्रेच्या परवानगी साठी माननीय लक्ष्मण सावजी, माननीय आमदार राहुल जी ढिकले, माननीय खासदार हेमंत गोडसे, माननीय नामदार पालकमंत्री छगनराव भुजबळ साहेब, या सर्वांनी खूप प्रयत्न केले, जर या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश आले नाही तर आम्ही सामान्य माणसाने काय करायचं?
एवढ्या मोठ्या वरच्या पदावरील आयपीएस अधिकारी यांनी उद्विग्न होऊन अशा प्रकारची पत्रकार परिषद घेणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि माननीय आयुक्तांच्या दबावाच्या मुद्द्यावर आमचे इतकेच म्हणणे आहे कि माननीय पोलीस आयुक्तांची बदली व्हावी हि आमची इच्छा नाही, किंवा हा आमचा उद्देशही नाही त्यांची बदली झालीच तर ती त्यांच्या कर्तुत्वाने होईल.