स्वातंत्र्याची पंचाहत्तरी यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक – नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक तर्फे आज संपूर्ण शहरात विविध ठिकाणी गुढीपाडव्या निमित्त गुढी पूजन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ७ वाजता श्री साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली येथे गुढीपूजन आणि पाठशाळेतील ब्रम्हवृंदानकडून शांतिमंत्रांचे पठण करण्यात आले, त्यानंतर नृत्यानंद कथ्थक नृत्य अकादमी च्या ३५ विद्यार्थिनीं तर्फे गणेश वंदना, नांदी आणि स्वराज्य पंच्याहत्तरी च्या थीम वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक आबासाहेब शिंगणे यांच्या हस्ते आणि स्वागत समिती अध्यक्ष, नाशिक प्रफुल्ल संचेती यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. तसेच भद्रकाली देवी मंदिर संस्थान तर्फे परिसरात छान रांगोळी काढण्यात आली. उपस्थित सर्व नागरिकांना पेढ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी समिती तर्फे श्री साक्षी गणेशाचे पूजन व आरती करण्यात आली, व हे वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विनायक चंद्रात्रे, शौनक गायधनी, मंदार कावळे, प्रतिक शुक्ल, कीर्ती शुक्ल, प्रियंका लोहिते, केतकी चंद्रात्रे, प्रसाद गर्भे, अंकुश पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी ७.३० वाजता काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे, गुढीपूजन व रवींद्र पैठणे यांच्या पाठशाळेच्या ब्रम्हवृंदानकडून शांतिमंत्रांचे पठण करण्यात आले. त्यानंतर लेझीम चे प्रात्यक्षिक व ढोलवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान वेणा भारती महाराज आणि जयंतराव गायधनी, सचिव – नववर्ष स्वागत यात्रा समिती, यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले, यावेळी योगेश गर्गे, निनाद पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, महेश महाकाळे, पराग पंचाक्षरी, आमदार राहुल ढिकले आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी ७.३० वाजता साई बाबा मंदिर, मधुबन कॉलनी, हेमकुंज सोसायटी येथे राजेश दरगोडे, सहसचिव, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व शिवाजी बोंदार्डे, चंद्रशेखर जोशी, पुष्कर अवधूत, अशोक मुर्तडक यांच्या उपास्थितीत गुढीपूजन करण्यात आले. यावेळी ढोलवादन, लेझीम आणि लाठीकाठी यांचे स्थिर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी परिसरातील सर्व महिलांनी गुढीचे औक्षण केले, महिलांचा मोठा उत्साह आणि मोठा सहभाग यावेळी दिसून आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. इंदिरानगर येथे सकाळी ८ वाजता गुढीपूजन, व महिलांतर्फे जवळच्या परिसरात व क्रीडांगण येथे महिला बाईक रॅली, स्थिर ढोलवादन आणि सायंकाळी खाद्यसंस्कृती मेळावा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विराज लोमटे – उपाध्यक्ष, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व सोनाली ताई कुलकर्णी उपस्थित होते. समर्थ ट्रॅक, आकाशवाणी केंद्रा जवळ सकाळी ८ वाजता गुढीपूजन आणि त्यानंतर नववर्षा निमित्त सण, संस्कृती आणि उत्सव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व व्याख्याते ओमप्रकाश कुलकर्णी व प्रकाश दिक्षीत – शहर समिती सदस्य हे उपस्थित होते.
मुक्ती धाम, नाशिक रोड येथे गोपालजी लाल – शहर समिती सदस्य यांच्या उपास्थितीत गुढीपूजन तसेच जाणता राजा मैदान, अशोक नगर येथे अमोल जोशी – शहर समिती सदस्य लोकेश कटारीया यांच्या उपस्थितीत गुढीपूजन करण्यात आले. दक्षिणमुखी हनुमान मंदिर , खुटवडनगर येथे गुढीपूजन करण्यात आले. नाना फड, उपाध्यक्ष – नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व स्वरूपा ताई मालपुरे- शहर समिती सदस्य , नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक हे यावेळी उपस्थित होते. तसेच हनुमान चौक सिडको, राणा प्रताप चौक येथे राजू गीते – शहर समिती सदस्य यांच्या उपस्थितीत गुढीपूजन व ढोलवादन करण्यात आले.
व प्रत्येक नागरिकाला घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे गुढीपूजन व स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी रोहित गायधनी – शहर समिती सदस्य, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व वैभाव फेंदार हे उपस्थित होते. एकूणच शहरात दोन वर्षांनंतर कोरोनाची मरगळ झटकून उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात नववर्ष स्वागत समिती तर्फे गुढीपाडवा साजरा करण्यात आला.