नवरात्रातील ललिता पंचमी महात्म्य
नवरात्रातील पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी (१० ऑक्टोबर) ललिता पंचमी आहे. ज्या भाविकांना कोणत्याही कारणास्तव पूर्ण नवरात्र पूजन करणे शक्य होत नाही, त्यांनी फक्त ललिता पंचमीच्या दिवशी जरी देवी पूजन केले तरी त्यांना नवरात्राचे महात्म लाभते, असा शास्त्रार्थ आहे.
नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या विविध ९ रूपांचे पूजन करतात. त्यामध्ये पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला देवी स्कंदमाता सोबतच माता ललिता पूजन केले जाते. त्याला केस उपांग ललिता व्रत असे म्हणतात.
माता ललिता ही देवी पार्वतीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे. तिला त्रिपूरसुंदरी असे म्हटले जाते. १० महाविद्येची ती देवता असेही म्हटले जाते. या दिवशी ललिता सहस्रनाम स्तोत्र व कुंकुमार्चन हे विधी महत्त्वाचे आहेत.
कालिका पुराणात माता ललिता देवी महात्म्य सांगितलेले आहे. ललिता पंचमी पूजनाचा मुहूर्त १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४.५५ पासून मध्यरात्री ०१:१४ वाजेपर्यंत आहे. ललितापंचमीची नियमित षोडशोपचारे पूजा व दिवसभर उपवास ठेवला जातो.