काबूल – अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्याने जगभरातच चिंतेचे वातावरण आहे. मानवी हक्कांची पायमल्ली तालिबानकडून होत असल्याने आणि कट्टर मुस्लिम धर्माची पताका उंचावली जात असल्याने अन्य धर्मीय बांधव अफगाणिस्तानात जीव मुठीत धरुन राहत असल्याचे सांगितले जाते. मात्र, काबूलमधील अतिशय प्राचीन अशा अस्माई देवीच्या मंदिरात चमत्कारच घडला. येथे हिंदू बांधवांनी नवरात्रीचा उत्सव साजरा केला. यावेळी हरे रामा, हरे कृष्णापासून विविध हिंदू धार्मिक गीत गाण्यात आले. तसेच, आम्हाला येथे सुखरुप राहू दे अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली. आणि भारत सरकारने आमची येथून तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/rsrobin1/status/1447894689848328194