नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. याच निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवी सप्तश्रृंगीचा नवरात्र उत्सवही गडावर सुरू झाला आहे. मूर्ती संवर्धनानंतर आजपासून मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने आज देवीच्या गाभाऱ्यात अतिशय आकर्षक अशी पुष्प सजावट देवीच्या निस्सिम भक्तांनी यंदाही केली आहे. अवधूत देशपांडे, शंकरराव जुन्नरे, जयेश मंडलिक, हेमाणी जेठवा, महाराज परभणी (देशपांडे) आणि पिंटु माळी यांच्या पथकाकडून देवी मंदिर ट्रस्टच्या मदतीने संपूर्ण नवरात्रोत्सवात देवीच्या गाभाऱ्याची पुष्प सजावट केली जाणार आहे. देवी मंदिर परिसर आणि गाभारा या सजावटीमुळे आणखीनच चैतन्यदायी बनला आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेची बघा हे अतिशय प्रसन्न छायाचित्रे
सर्व छायाचित्रे – श्री अवधूत देशपांडे, नाशिक
Navratra Festival First Day Photos of Saptashrungi Devi