नवरात्रातील अष्टमी महात्म्य
पंडित दिनेश पंत
नवरात्रात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचे प्रसाद, नवदुर्गां स्वरूपांचे पूजन केले जाते. त्यामध्ये अष्टमीस विशेष महत्त्व आहे. अष्टमीला देवीच्या महागौरी स्वरूपाचे पूजन केले जाते.
यंदा १२ ऑक्टोबरला रात्री ९.४७ वाजेपासून १३ ऑक्टोबर रात्री ८.०७ वाजेपर्यंत अष्टमी तिथी आहे.
अष्टमीला अनेक ठिकाणी चक्र पूजेचे आयोजन असते.
चक्र पूजेमध्ये विविध प्रकारची धान्य फळे, विविध नैवेद्य याद्वारे देवीची आराधना केली जाते.
अनेक घरांमध्ये अष्टमीचा होम-हवन केले जाते. ह्याच दिवशी कन्या पूजनास विशेष महत्व आहे.
कन्याला ओवाळणे, औक्षण करणे, तिला गोडधोड खाऊ घालणे, नवीन वस्त्र देणे अशा रितीने कन्येला मानपान दिला जातो.