इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वोच्च न्यायालयाने 1988 च्या रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले आहे. सिद्धू कपड्यांनी भरलेली बॅग घेऊन न्यायालयात पोहोचले. यावेळी ते कुणाशीही बोलले नाही.
सिद्धू यांचे माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांना सांगितले की, आत्मसमर्पण केल्यानंतर आता त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि म्हटले की, अपुरी शिक्षा सुनावण्याबद्दल कोणतीही अवाजवी सहानुभूती न्याय व्यवस्थेचे अधिक नुकसान करेल आणि कायद्यावरील लोकांचा विश्वास कमी करेल.
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी वैद्यकीय बाबी सुव्यवस्थित केल्याचा हवाला देत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना झालेल्या एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी देण्याची विनंती केली. न्यायालयाने सांगितले की, यासाठी तुम्हाला आधी अर्ज करावा लागेल.
सिद्धूची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती जे. जे. बी. पार्डीवाला यांनी खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला आणि सांगितले की, सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी हवा आहे.
खंडपीठाने म्हटले की, ‘तुम्ही हा अर्ज सरन्यायाधीशांसमोर दाखल करू शकता. सरन्यायाधीशांनी आज खंडपीठ स्थापन केल्यास आम्ही त्यावर विचार करू. खंडपीठ उपलब्ध नसल्यास ते स्थापन केले जाईल.
https://twitter.com/ANI/status/1527597808517206016?s=20&t=BxZkBmzkBPX1K_9G7Vha6Q