नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिध्दू यांची अखेर काँग्रेसने नियुक्ती केली आहे. सिध्दू यांच्या निवडीबरोबरच संगत सिंह, कुलजीत नागरा, पवन गोयल आणि सुखविंदर डैनी यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचा नवज्योतसिंग सिध्दू यांना विरोध असतांनाही काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
पंजाव विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे हे बदल करुन काँग्रेसने सिध्दूला प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. या निवडीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध वाढण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंग सिध्दू हे भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झाले. विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत सिध्दूने जोरदार काँग्रेसचा प्रचार केला. त्यानंतर काँग्रेसची पंजाबमध्ये सत्ताही आली व सिध्दू मंत्रीही झाले. पण, त्यांना मुख्यमंत्र्याच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय़ सिध्दूने घेतला. ५७ वर्षीय सिध्दू क्रिकेट व टी.व्हीच्या विविध शोमुळे प्रसिध्द आहे. त्यांचे आक्रमक भाषण व शेरोशायरीमुळे ते सामान्यांच्या मनात घरही करतात. त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1416797790122831872?s=20