इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उबाठा गटासह इतर पक्षातील एकूण १३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड, माजी नगरसेविका प्रणाली अविनाश लाड, दापोली नगरपरिषदेचे नगरसेवक अविनाश मोहिते, नवी मुंबईतील उबाठा गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सौ.कोमल वास्कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड, माजी नगरसेविका सौ.दिव्या गायकवाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, माजी नगरसेविका सौ.हेमांगी सोनावणे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी आणि उबाठा गटाच्या उपशहर संघटक सौ.शशिकला रंगनाथ औटी, उबाठाचे शहर प्रमुख काशिनाथ पवार, उबाठा गटाच्या उपजिल्हासंघटक व माजी नगरसेविका सौ.भारती कोळी, उबाठाच्या माजी नगरसेविका सौ.मेघाली राऊत, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, माजी नगरसेविका सौ.आरती शिंदे, उबाठाचे पदाधिकारी सदाशिव मनगुटकर, माणिक पाटील, चंद्रकांत शेवाळे, हितेश पाटील, शाखा प्रमुख रविंद्र कदम, मंदार सावंत, अलका राजे, अंकुश वैती, तुकाराम काळे यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय चौगुले, विजय नाहटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, मनोज शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.