येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कोटमगाव जगदंबा देवस्थान येथे विधिवत पूजन करत घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे, शेतमालाला भाव मिळू दे, राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्या नागरिकांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली. तसेच उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमाने, नाना लहरे, राजेंद्र कोटमे, भाऊसाहेब पाटील लहरे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, नितीन गायकवाड, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, भगवान ठोंबरे, भाऊसाहेब धनवटे, दीपक गायकवाड, समाधान पगारे, पार्थ कासार, विशाल परदेशी, गणेश गवळी, वाल्मीक कुमावत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंदिर परिसरात असलेल्या विक्रेत्यांच्या स्टॉलला भेटी देत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या मोफत चरणसेवा केंद्रास भेट देऊन प्रा.प्रभाकर झळके यांच्या या कार्याबद्दल सन्मान केला.