सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज आहे घटस्थापना; असे आहे नवरात्रोत्सवाचे महात्म्य…नऊ दिवस कोणते कपडे घालावे

by Gautam Sancheti
सप्टेंबर 22, 2025 | 7:40 am
in मुख्य बातमी
0
Untitled 30


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना अर्थात शरद ऋतूच्या सुरुवातीस म्हणून शारदीय नवरात्रास सुरुवात होते. त्याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीचे पूजन. देवीच्या नऊ रूपांचे अर्थात नवदुर्गाचे पूजन. संपूर्ण भारतभरात विविध नावाने व विविध पद्धतीने नऊ दिवस केले जातात.

पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कृष्णानदीती, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायानी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी व शेवटच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री या नवदुर्गा होत. शास्त्रात देवीची सौम्या आणि रुद्र अशी दोन प्रकारची रूपे सांगितली आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत. तर दुर्गा, काली, चंडी आणि भैरवी ही रुद्र रूपे आहेत.

नऊ दिवस देवीला विविध ९ प्रकारचे नैवेद्य दाखवतात. त्यातील पहिल्या दिवशी शुद्ध तूप, दुसऱ्या दिवशी साखर, तिसऱ्या दिवशी दूध, चौथ्या दिवशी मालपोहा, पाचव्या दिवशी केळी, सहाव्या दिवशी मध, सातव्या दिवशी गुळ, आठव्या दिवशी नारळ, नवव्या दिवशी तीळ या क्रमाने नैवेद्य दाखवावा.

नवरात्रीच्या नऊ दिवसांना नऊ माळा असे म्हटले जाते. त्याचे कारण प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या फुलांची माळ वाहिली जाते. पहिल्या दिवशी सोनचाफा, दुसऱ्या दिवशी मोगरा, तिसऱ्या दिवशी गोकरण, कृष्णकमळ, चौथ्या दिवशी भगवा झेंडू, पाचव्या दिवशी बेल माळ, सहाव्या दिवशी कर्दळी फुले, सातवा दिवशी लाल झेंडू, आठव्या दिवशी लाल फुले, नवव्या दिवशी कुंकुमार्चन अशा प्रमाणे माळा वाहाव्यात.

नवरात्रातील अष्टमीचा होम अर्थात चक्रपुजा यास विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी नवसपूर्तीसाठी चक्र पूजा केली जाते. कृष्णाने युद्धातील विजयासाठी पांडवांकडून चक्र पूजा करून घेतली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. अष्टमीला सांजोऱ्या व कडकण्या यांचा नैवेद्य दाखवून घटा समोर बांधले जातात.

घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य
कुलदैवता प्रतिमा, कलश, नारळ, केळीचे पान, फुले, सप्तधान्य, मातीचा घट, शेतातील काळी माती, शंख, घंटा, समई, नंदादीप, वात, धूप, दीप. षोडशोपचारे घटस्थापना पूजा झाल्यानंतर नऊ दिवस सकाळ, सायंकाळ देवीची आरती करुन नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात अनेक भाविक नऊ दिवस उपवास ठेवतात तर सप्तशती पाठ, दुर्गा महात्म्य, देवी महात्म्य, देवी सहस्त्रनाम, दुर्गा स्तुति, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, देवी सूक्त, दुर्गा सप्तशती सार, देवी अश्टोत्तरा सतनामावली अशा आदिमाया शक्तीच्या विविध रूपांचे मंत्र पठण करतात. महिलाभगिनी वर्ग देखील नवरात्रातील प्रत्येक माळेला देवीला अर्पण करण्यानुसार असलेल्या फुलांच्या विविध रंगानुसार असलेल्या रंगाच्या साड्या परिधान करतात. त्यानुसार यंदा पहिल्या माळेला पिवळा रंग, दुसरी माळ हिरवा रंग, तिसरी माळ करडा रंग, चौथी माळ नारिंगी रंग, पाचवी माळ पांढरा रंग, सहावी माळ लाल रंग, सातवी माळ निळा रंग, आठवी माळ गुलाबी व नववी माळ जांभळा रंग आहे. नवरात्रानंतर दहाव्या दिवशी सीमोल्लंघन अर्थात दसरा सण साजरा केला जातो. त्यादिवशी सोने लुटणे म्हणजेच आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.

नवरात्र उत्सवात कोणते कपडे घालावे…
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात वारानुसार कोणते कपडे घालावे. यासाठी खालील रंग देत आहे. तसे पाहिले असता याचा आणि नवरात्राचा काहीही संबंध नाही पण एक वेगळा आनंद व ग्रुप फोटो काढण्याकरिता रंग देत आहे.

शारदीय नवरात्री २०२५ मधील रंगांची यादी:
१) प्रतिपदा (सोमवार, २२ सप्टेंबर): पांढरा
२) द्वितीया (मंगळवार, २३ सप्टेंबर): लाल
३) तृतीया (बुधवार, २४ सप्टेंबर): निळा
४) चतुर्थी (गुरुवार, २५ सप्टेंबर): पिवळा
५) पंचमी (शुक्रवार, २६ सप्टेंबर): हिरवा
६) षष्ठी (शनिवार, २७ सप्टेंबर): राखाडी (किंवा जांभळा)
७) सप्तमी (रविवार, २८ सप्टेंबर): नारंगी
८) अष्टमी (सोमवार, २९ सप्टेंबर): गुलाबी (किंवा पांढरा)
९) नवमी (मंगळवार, ३० सप्टेंबर): मोरपंखी निळा (किंवा लाल)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, सोमवार, २२ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास या तारखे पर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 22, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

सप्टेंबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, सोमवार, २२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 21, 2025
IMG 20250921 WA0434 1
स्थानिक बातम्या

संयुक्त राष्ट्र महासभेच्या UNGA80 विज्ञान शिखर परिषदेत एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले देशाचे प्रतिनिधित्व

सप्टेंबर 21, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
Next Post
modi 111

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011