नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्यामुळेच दिवसागणिक या विभागातील विविध लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकत आहेत. त्यात वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आताही नवापूर तालुक्यातील एक लाचखोर जाळ्यात अडकला आहे. विनोद साकरलाल पंचोली (वय-५० वर्षे) असे या लाचखोराचे नाव आहे. तो नवापूरच्या दी. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, दी. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे त्यांच्या रजा रोखिकरण करायचे होते. त्यासाठी या कर्मचाऱ्याने लाचखोर पंचोली याची भेट घेतली. या कर्मचाऱ्याला त्या रकमेचा धनादेश मिळाला. तसेच, त्याच्या बँक खात्यात ही रक्कमही जमा झाली. रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात लाचखोर पंचोली याने ४५००० रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाखोर पंचोली हा सापळ्यात रंगेहाथ सापडला. याप्रकरणी लाचखोर पंचोलीवर नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी:-
श्री राकेश आ. चौधरी पो. उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार,मो. नं.9823319220
सापळा कार्यवाही पथक:-
पोहवा/विलास पाटील, पोहवा/ज्योती पाटील, पोना/देवराम गावित, पोना/अमोल मराठे सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार.
सापळा मदत पथक:-
समाधान एम.वाघ, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार. पोहवा/विजय ठाकरे, पोना/संदीप नावडेकर, चापोना/जितेंद्र महाले सर्व नेम. अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.
मार्गदर्शक:-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391
2) मा.श्री.माधव रेड्डी सर., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) श्री.नरेंद्र पवार ., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288
दरम्यान, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, जयचंद नगर, नंदुरबार दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९
टोल फ्रि क्रं. 1064