नाशिक – कोरोना आजाराचे मनावर मानसिक दडपण येऊ नये व निरामय आरोग्यासाठी समतोल आहार, उत्कृष्ट स्वयंपाक आणि स्वादिष्ट भोजन यासाठी नवहितगुज महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे. मंडळाने ‘पाककला कौशल्य स्पर्धा’ ऑनलाईनरित्या आयोजित केली आहे. तशी माहिती नवहितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा मुसळे व समिती प्रमुख प्रणाली बागड यांनी दिली.
या पाककला कौशल्य स्पर्धेमध्ये स्पर्धेकांनी ए४ साईज पेपरवर पाक कृतीची माहीती कॉम्प्युवरद्वारे टाईपींग करून पाठवायची आहे. या स्पर्धेसाठी विविध प्रकारचे सूप, सॉस, चटणी, लोणचे, मुरंबे, भात, भाजी, कडधान्याचे पदार्थ, केक, सरबत, पराठा, उपवासाचे पदार्थ, पारंपारिक सणांचे वेळी तयार केले जाणारे पदार्थ यापैकी कोणत्याही पाककृतींमध्ये सहभाग नोंदवता येईल.
स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रणाली बागड ९८२३०३८३४५ या नंबरवर संपर्क साधावा. या स्पर्धेत ५ स्पर्धेकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी पाककृतीचे पेज दि. २० ते ते ३१ मे २०२१ पर्यंत प्रणाली बागड ९८२३०३८३४५, सरिता शिरूडे ९२२७७००३८, लिना बागड ७५८८७३६७९६, सुचित्रा बाविस्कर ९४०३५११८१३ या क्रमांकावर पाठवावे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या ‘पाककला कौशल्य स्पर्धेत’ जास्तीत जास्त सभासद महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन महिला मंडळाच्या कार्यकारिणीने केले आहे.