नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेचे आयोजन दि ५ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले असून या दोन दिवसांत चार नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. नाट्यस्पर्धा उद्घाटन तथा पारितोषिक समारंभाचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे असणार आहेत.
मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून नंतर लगेच सकाळी ११ वा. कोकण प्रादेशिक विभागाचे “आवर्त” तर दुपारी ३.३० वा. पुणे प्रादेशिक विभागाचे “डॉक्टर तुम्ही सुद्धा” हे नाटक सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वाजता नागपूर प्रादेशिक विभागाचे “रंगबावरी” तर दुपारी २ वा. छत्रपती संभाजी नगरचे “केस नं. ९९” हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
बुधवारी दि. (६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५.३० वा. नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. उद्घाटन व पारितोषिक समारंभप्रसंगी महावितरणचे संचालक(प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार, संचालक (वित्त)अनुप दिघे, संचालक (वाणिज्यिक ) योगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि नाट्य स्पर्धेचे मुख्य समन्वयक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस चारही नाट्याचे प्रयोग विनामूल्य असून, नाट्य रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा आणि महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आवाहन राज्यनाट्य स्पर्धेचे निमंत्रक नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे व आयोजन समिती सदस्य यांनी केले आहे.