सिन्नर – पेट्रोल डिझेल दरवाढीला जबाबदार असणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने ठाणगाव येथे मोफत पेट्रोल वाटप केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असतानाही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल डिझेलच्या सातत्याने दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकांवर त्याचा दुष्परिणाम होऊन सर्वच दैनंदिन उपयोगातील जीवनावश्यक बाबींची प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ आज सर्वसामान्य जनतेच्या माथी मारली जात आहे. सर्वसामान्य जनता त्यामुळे मेटकुटीस आली आहे. कोरोनासदृश्य परिस्थितीत किराणा बाजारभाव, शेतउपयोगी औषधे, रासायनिक खतांचे बाजारभावांनी उच्चाक गाठला आहे. त्याचा निषेधार्थ मोफत पेट्रोल वाटप केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य जनतेला होरपाळावणारी दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ऐ. टी. शिंदे, पाडळीचे ग्रा. प. सदस्य चंद्रभान रेवगडे, प्रशांत काकड, योगेश शिंदे, अंकुश शिंदे, रामचंद्र शिंदे, शरद रेवगडे, नामदेव शिंदे, देवराम पाटोळे, अरुण रेवगडे, रावसाहेब शिंदे, दत्तू पाटोळे, दत्तू रेवगडे, नारायण जाधव, अरुण शिंदे आदी उपस्थित होते.