नाशिक – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दि.९जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन मुंबई नाका नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे. यावेळी जिल्ह्यातील आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच हे नाशिक दौऱ्यावर असून ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून आगामी निवडणूका तसेच पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यासाठी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.