नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे एमआरएफ राष्ट्रीय मोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ८० स्पर्धकांनी भाग घेतला. चित्तथरारक कसरती आणि नेत्रदीपक रायडिंगद्वारे रायडर्सनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
या राष्ट्रीय स्पर्धेत हे तेविसावे वर्ष असून, २०२३ सालच्या स्पर्धेतील ही तिसरी फेरी आहे. वाहनांच्या रायडिंग मार्गावर एकूण १५ जम्प्स, १ टेबलटॉप आणि १ कट टेबलटॉप लावण्यात आले होते. या रायडिंग स्पर्धेने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.