शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रीय लोक अदालतीचा असा आहे पुणे पॅटर्न

जुलै 9, 2022 | 5:06 am
in इतर
0
lok adalat 750x375 1

 

राष्ट्रीय लोक अदालतीचा असा आहे पुणे पॅटर्न

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या सहा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७ लाखापेक्षा अधीक दाखल प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. लोक अदालतीचा हा यशस्वी पुणे पॅटर्न राज्यासाठी पथदर्शी असाच आहे.

जलद न्याय
वाद उद्भवला तर शक्यतो सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे. गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येवून कोणामध्ये उद्भवलेला वाद समजुतीने मिटवित असायचे. सध्याचे लोकन्यायालय म्हणजे आधुनिक रूप आहे. कायदा जाणणाऱ्या निःपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रकरणात सामंजस्याने न्याय तडजोड होते. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुदीअंतर्गत राज्य, जिल्हा विधी सेवा – प्राधिकरणे व तालुका विधी सेवा समित्याद्वारे लोकन्यायालयाचे आयोजन करून जलद न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. २०२०, २०२१ व २०२२ मध्ये आजपर्यंत सहा राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढीत पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

शुल्क नाही
लोकअदालतीत प्रकरण सामंजस्याने मिटले असेल या प्रकरणाच्या निवाड्यामध्ये संबंधित पक्षकाराने या प्रकरणामध्ये भरलेले न्यायालयीन शुल्क त्याला विधी सेवा प्राधिकरण कायदा कलम २१ आणि भारतीय कोर्ट फी कायदा १८७० प्रमाणे तसेच विधी व न्याय विभागाने निर्देर्शित केल्याप्रमाणे परत मिळणेबाबतचा आदेश करण्यात येतो. लोक अदालतीत प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

जिंकल्याची भावना
लोकन्यायालयामध्ये प्रकरण मिटले तर दोन्ही पक्षकारांमध्ये दोघेही जिंकल्याची भावना निर्माण होते. दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. लोकन्यायालयामध्ये प्रकरण मिटले यामध्ये अपील करता येत नाही. न्यायालयात प्रलंबित प्रकरणेही सामंजस्याने मिटविण्यासाठी लोकअदालतीत ठेवली जातात. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकरणे लोक अदालतीत निकाली काढून पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ताण कमी होण्यास मदत
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयामधील प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली काढली जातात. न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणाचा ताण कमी होण्यास लोकन्यायालयाची मदत होते तसेच भारतीय संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होते.

सहा लोक अदालतीतील ठळक नोंदी
– १२ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या लोक अदालतीत १३ हजार ५६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ५ हजार २२६ प्रलंबित तर ८ हजार ३३५ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
– १ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३३ हजार ६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये १५ हजार ५६२ प्रलंबित तर १७ हजार ४९९ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

– २५ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३ लाख १७ हजार ८३६ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ८ हजार ९६३ प्रलंबित तर ३ लाख ८ हजार ८७३ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
– ११ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत २ लाख ६० हजार ४१५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ८ हजार ७७१ प्रलंबित तर २ लाख ५१ हजार ६४४ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

– १२ मार्च २०२२ रोजी झालेल्या लोक अदालतीत ४६ हजार ६५९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये १६ हजार ६९५ प्रलंबित तर २९ हजार ९६४ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
– ७ मे २०२२ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३२ हजार ९६ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ११ हजार ७८ प्रलंबित तर २१ हजार १८ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

मंगल कश्यप, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे-जिल्ह्यात जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सहाही लोक अदालतीच्या माध्यमातून ७ लाख ३ हजार ६२८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ६६ हजार २९५ प्रलंबित तर ६ लाख ३७ हजार ३३३ दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश आहे. या सहाही लोक अदालतीत एकूण २ लाख ४४ हजार १९० प्रलंबित तर २२ लाख ४३ हजार ४१० दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पुढील लोक अदालत १३ ऑगस्ट २०२२ रोजी आहे.

National Lok Adalat Pune Pattern Legal Court

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील हे कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात पती-पत्नी; मुंबईत घेतले नवे घर

Next Post

तुम्हाला सतत जांभई येते का? ही असू शकतात कारणे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
yawning

तुम्हाला सतत जांभई येते का? ही असू शकतात कारणे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011