गोंदिया (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या संघटनेची राज्य शाखेची 61 वी वार्षिक राज्य प्रतिनिधी सभा अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली. संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी नाशिकचे डॉ. तुषार अभिमन्यू सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एन.आय.एम.ए. गोंदिया शाखेने केलेले सभेचे आयोजन अत्यंत उत्तम होतें. सर्व आलेल्या राज्य प्रतिनिधींनी अत्यंत सक्रियतेने, सकारात्मतेने चर्चेत सहभाग घेतला.
डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. विनायक टेंभूर्णीकर, डाॅ. गजानन पडघन, डाॅ. शैलेश निकम यांच्या मार्गदर्शनात आणि डॉ. सुहास जाधव, डाॅ. अनिल बाजारे, डॉ. भूषण वाणी आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणीच्या सहकार्याने सभा यशस्वीपणे पार पडली. निमा महाराष्ट्र राज्य शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण मीटिंग मध्ये डाॅ. अनिल पत्की, डाॅ मनोज सांगळे, व डाॅ. देवेंद्र बच्छाव या त्रिसदस्यीय निवड समितीने 2022-2024 ह्या कार्यकाळासाठी बिनविरोध कार्यकारिणी घोषित केली.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( N.I.M.A ) या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यरत एकूण 237 शाखांमधील सुमारे 27000 सदस्य संख्येतील सुमारे हजार पेक्षा जास्त राज्य कार्यकारिणी सदस्यांमधून सन 2022-24 या कालावधीसाठी नाशिक येथील डाॅ. तुषार अभिमन्यु सूर्यवंशी यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी व छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव पदी डाॅ. राहुल पगार यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे.
या बरोबरच नागपूरचे डॉ. मोहन येंडे यांची सचिवपदी, मोताळा येथील डॉ. सोपान खर्चे यांची कोषाध्यक्ष पदी आणि उर्वरित संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण कार्यकारीणीचे सर्व स्तरांवर हार्दिक अभिनंदन होत आहे. नाशिक शाखेला अत्यंत महत्वाची अशी दोन पदे बिनविरोध घोषित झालेली आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष आणि विभागीय सचिव या पदांचा समावेश आहे. याबद्दल निमा नाशिक जिल्हा शाखेतर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
National Integrated Medical Association President Declared