इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आत्महत्या अनेक जण करतात, कुणी विषारी औषध घेऊन, गळफास घेऊन तर काही जण नदीत उडी मारून जीवन संपवतात. परंतु गुजरात मध्ये आत्महत्याचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एका इसमाने आणि त्याच्या पत्नीने आपल्या स्वतःचा बळी देण्यासाठी ‘गिलोटिन’ (कोयता) सारख्या उपकरणाचा वापर करून शिरच्छेद करून आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत दाम्पत्यांनी हे उपकरण घरीच बनवले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेमुभाई मकवाना (३८) आणि त्यांची पत्नी हंसाबेन (३५) यांनी विंचिया गावातील त्यांच्या शेतातील झोपडीत कोयत्या सारख्या औजाराच्या आत्महत्या केली, पती-पत्नीने आत्महत्येचे नियोजन काही दिवसापूर्वीच करुन ठेवले होते. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पती-पत्नीने आत्महत्येचा हा बेत अशा प्रकारे राबवला की, त्यांचे डोके कापल्यानंतर ते खाली पडून थेट अग्निकुंडात गेले.
दोऱ्याने बांधलेल्या गिलोटिन सारख्या यंत्राखाली डोके ठेवण्यापूर्वी या जोडप्याने अग्निकुंड तयार केला. त्यांनी दोरी सोडताच, लोखंडी कोयता त्यांच्यावर पडला, ज्यामुळे त्यांचे डोके धडापासून तुटले आणि ते अग्निकुंडात पडले. या दोघांच्या नातेवाईक कुटुंबीयांनी सांगितले की, दोघे गेल्या एक वर्षापासून रोज झोपडीत गुप्त पूजा करत होते. या जोडप्याला दोन मुले, आई-वडील असून आणि इतर नातेवाईक जवळच राहतात. परंतु झोपडीचे दार लावलेले असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रकार कळला.
या जोडप्याकडून एक सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आली असून त्यामध्ये त्यांनी नातेवाईकांना आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सध्या परिसरात या घटनेची उलट सुलट चर्चा असून या दोघांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
National Husband Wife Ritual Suicide Crime Gujrat