नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान हलदानी उत्तराखंड येथे ३८ व्या नॅशनल गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राने चुरशीच्या सामन्यात ओरिसा संघाचा पराभव करून विजेते पदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या संघात एस एम आर के महिला महाविद्यालयाची खेळाडू कुमारी ऋतुजा सहारे हिचा समावेश होता. ऋतुजा “संस्कृती” नाशिक आणि स्व सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीची खेळाडू असून ती वर्षभर नियमीत सकाळ आणि सायंकाळीं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, नाशिक येथे गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत असते.
सलग दुसऱ्या वर्षी नॅशनल गेम्स साठी महाराष्ट्राच्या संघात प्रबोधिनीच्या खेळाडूची निवड झाली आहे.राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारी ऋतुजा प्रबोधिनीची सतरावी खेळाडू आहे. नॅशनल गेम्स खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल नाशिक जिल्हा खो खो असोचे अध्यक्ष डॉक्टर प्रदिप पवार, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनिल गायकवाड, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष माजी नगरसेवक शाहू महाराज खैरे यांनी तिचे अभिनंदन केले.