शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये १७ व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धाला उत्साहात प्रारंभ; ३२ राज्यांचे १४७८ खेळाडू सहभागी

डिसेंबर 11, 2022 | 4:52 pm
in स्थानिक बातम्या
0
17th fencing Opening match with chief Guest 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभागाच्या मोलच्या सहकार्याने नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथील इनडोअर हॉलमध्ये कॅडेट गटाच्या १८ वर्षे वयोगटाच्या १७ व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव प्रमोद जाधव, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्या हस्ते आणि मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोगल, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, दत्ता गलाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व जिल्हयाचे सचिव, पदाधीकारी, प्रतिनिधि यांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना प्रमोद जाधव यांनी सांगितले की खेळाडूनी मेहनत केल्यास त्यांना यश जरुर मिळते. त्यामुळे खेळाडूनी या संधीचा फायदा घेऊन भारताचे नांव उज्वल करावे असे सांगितले. यावेळी केशवअण्णा पाटील यांनिहीही खेळाडूंना शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे अशोक दुधारे यांनी केले तर सूत्रसंचालन उदय खरे यांनी केले. दिनांक ११ ते १४ डिसेंबर, २०२२ दरम्यान आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ३२ राज्यांचे १४७८ खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, एस. एस. सि. बी., केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, पोंडेचरी, गुजराथ, दिव-दमण, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओरिसा, मिझोराम, मणीपुर, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, तेलंगणा, झारखंड, नागालँड, चंदीगड, गोवा, मिझोराम, त्रिपुरा, पोंडेचरी याचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या सुटसुटीत आयोजनासाठी ९० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पंच, तांत्रिक अधिकारी कार्यरत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था क्रीडा संकुल, जनार्दन स्वामी आश्रम, भक्ति संकुल, तर भोजन व्यवस्था क्रीडा संकुल येथे कर करण्यात आली आहे. या स्पर्धेचे संपूर्ण चित्रणफेसबुकवर थेट लाइव्ह करण्यात येत आहे.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा यासाठी निवड केली जाणार आहे. तर या स्पर्धेतील पहिले आठ संघ मध्यप्रदेश येथे आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटील, फेडेरेशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, जेष्ठ क्रीडा संघटक अशोक दुधारे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यासाठी विविध कामिटीं तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी राजू शिंदे, दीपक निकम, उदय खरे, अजिंक्य दुधारे, दिपक पाटील, जय शर्मा, अविनाश वाघ, राहुल फडोळ आणि राष्ट्रीय खेळाडू कार्यरत आहेत.

उदघाटनांनंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात झाली. आज खेळल्या गेलेल्या मुलांच्या सॅबर या वैयक्तिक प्रकारात एस. एस. सि. बी. आणि महाराष्ट्राच्या खेळाडूनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पहिल्या फेरीमध्ये विजय प्राप्त केले. तर हरियाणा, मणीपुर, जमू-काश्मीरच्या खेळाडूनीही चांगला खेळ करून पहिलं राऊंड जिंकून चांगली सुरवात केली आहे. मुलींच्या फॉईल प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही, अंकिता सोळकी, गायत्री गोरे आणि यशश्री वंजारे यांनी आपल्या प्राथमिक फेरीमध्ये चांगला खेळ करून अनुक्रमे २८, २०, ७ आणि २२ गुण मिळविले आहेत. मुलांच्या ई. पी. प्रकारात महाराष्ट्राच्या सोहम शेटे आणि यश वाघ यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

आजच्या स्पर्धेचे निकाल –
मुले वैयक्तिक सॅबर –
– ए. यू. अल्लिन (एस. एस. सि. बी.० विजयी विरुद्ध प्रखर सिंघ (राजस्थान) (१०-०१)
– अनमोल शर्मा (पंजाब) विजयी विरुद्ध सुरेनदार कुमार (हरयाणा) (१०-०७)
– प्रणव नोरील (चंदीगड) विजयी विरुद्ध हरी रेड्डी (तेतेलंगणा)(१०-०९)
– नीसची गोंदर (एस. एस. सि. बी.) विजयी विरुद्ध अरणाव पोटे (गुजराथ) (१०-०१)
– सूर्यश शर्मा (जममी-काश्मीर) विजयी विरुद्ध अठोकपाम थोइनाओ (मणीपुर) (१०-०७
– हर्षवर्धन औताडे (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध हरीमन गारथी (चंदीगड) (१०-०७)
– श्रेयश जाधव (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध विकास गुर्जर (राजस्थान) (१०-०१)
– अनिल दिपक( हरियाणा विजयी विरुद्ध आदित्य वाव्हळ (महाराष्ट्र) (१०-०५ )

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर-शिर्डी महामार्गावर इनोव्हा कारची दुचाकीला धडक; दोन जण जागीच ठार

Next Post

मानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेच्या दोन दिवसीय परिषदेत या विषयावर झाली चर्चा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20221211 WA0285 1 e1670758040130

मानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेच्या दोन दिवसीय परिषदेत या विषयावर झाली चर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011