इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने नमस्ते अभियानात ६ ऑगस्ट रोजी बोरिवली स्थानकावर तटबंदीय स्वरुपातील व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३०० पेक्षा जास्त तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांना रेल्वे सुरक्षा दल आणि सरकारी रेल्वे पोलिसांचे सहकार्य लाभले. या मोहिमेमुळे सुमारे ५२०० विनातिकीट प्रवासी पकडता आले आणि त्यांच्याकडून १३.५० लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
सुरक्षितता आणि पारदर्शकतेची सुनिश्चिती करण्यासाठी, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकरता विशेष संरक्षक व्हेस्ट तयार करण्यात आला आहे. या व्हेस्टमध्ये बॉडी कॅमेरे, हँड हेल्ड टर्मिनल्स, अतिरिक्त भाडे पावती पुस्तिका (EFT Book) आणि सार्वजनिक घोषणांसाठी छोटे स्पीकर ठेवण्यासाठीचे कप्पे आहेत. या तांत्रिक एकात्मिकीकरणामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तसेच कायदेशीर संरक्षणाची तजवीज होते, आणि त्याचवेळी प्रवाशांशी संवाद साधतानाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्वातही सुधारणा घडवून आणली जाते. या अभियानाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानकाच्या आवारात प्री-कस्टडी एरिया अर्थात ताब्यात घेण्यापूर्वीच्या कार्यवाहीसाठीच्या स्वतंत्र सुविधेची निर्मिती. हे सुविधा क्षेत्र म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली विनातिकीट प्रवाशांसोबत सन्मानपूर्वक आणि नियंत्रित स्वरुपातील व्यवहारासाठी आखलेल्या विशेष जागा आहेत. यामुळे अधिकृत कार्यालयात होणारे संभाव्य वाद आणि अनावश्यक संघर्ष टाळण्यास मदत होते, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही योग्य वागणूक मिळते. व्यावसायिक विभागातर्फे कर्मचाऱ्यांसाठी प्रभावी संवाद आणि व्यावसायिक पद्धतीने प्रवाशांना हाताळण्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात
नमस्ते अभियान हे शासन प्रशासन एकाच वेळी किती मजबूत आणि संवेदनशील असू शकते, याचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. हा उपक्रम शिस्तीच्या मूल्याला महत्त्व देणाऱ्या नैतिक सार्वजनिक प्रशासनाचा एक आदर्श उपक्रम ठरला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून, पश्चिम रेल्वेने सर्वांसाठी एक सुरक्षित, आदरयुक्त आणि उत्तरदायी रेल्वे सेवेचा अनुभव देत राहण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.