इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई एलिफंटा जाणारी खासगी बोट बुधवार बुडाली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेले संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले होते. पण, त्यात त्यांचा मृत्यू झाला.राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहीरे असे बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचे नाव आहे. ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते.
राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसापुर्वी पत्नी व मुलासह मुंबई आले होते. दोन दिवस रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहेर कुटुंबीयांचा मृत्यू झाला.
या घटनेत राकेश आहेर यांचा जागीच पाण्यात बुडून मुत्यू झाला. पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आहेर कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.