इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघे वीस वर्षीय युवक सातपूर परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या गेट समोरून कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते. त्याच वेळेस अचानक या ठिकाणी असलेले जुनाट व वाळलेले मोठे झाड अचानक मुळासकट उखडून यांच्या एक्टिवा Mh 15 HW 0565 या दूचाकी वर पडले, त्यात एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत गौरव भास्कर रिपोर्ट व सम्यक भोसले यांचा मृत्यू झाला. हे देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाब वाडी येथे राहत होते. दोघे युवक कुटुंबात एकुलते एक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. दोघे तरुण मित्र होते व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते सोबतच कंपनीत रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत होते. या घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.