नाशिकरोड – येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात आज एका ४५ वर्षीय महिलेने वीस वर्षापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला. या महिलेने हा दावा घालतांना गोंधळही घातला. आपल्याकडे प्रतिज्ञापत्रही असल्याचे तिचे म्हणणे होते. बुधवारी दुपारच्यावेळी ही घटना घडली. नाशिकरोड पोलीसांनी येथे धाव घेत संबधित महिलेची समजूत काढल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. याविषयी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी या घटनेबाबत सांगितले की, ही महिला गोंधळ घातत असतांना पोलीस वेळीच घटनास्थळी हजर झाले. महिलेच्या बोलण्यात काही एक तथ्य दिसुन आले नाही. उलट या घटनेबाबत संबधित महिलेची आम्ही समजूत काढली. त्यानंतर तिने माफी देखील मागितली आहे. पण, या दाव्यामुळे हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला.