नाशिकरोड – जेलरोड येथील दसक परिसरातील सीएनजी पंपावर गॅस टाकी मधील गॅस भरत असताना पाईप फुटल्याने अचानक गॅस गळती झाली, त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर झाले होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गळती थांबली आणि मोठा अनर्थ टळला. डिझेल पेट्रोल भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे चारचाकी वाहन धारकांचा सीएनजी कडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. नाशिक रोड परिसरात दोन सीएनजी पंप आहे. जेलरोड दसक येथील आढाव पेट्रोलियम सीएनजी पंपावर मंगळवारी सकाळी ९:१५ वाजेच्या दरम्यान सीएनजी गॅस गाडी मधून गॅस टाकीमध्ये सीएनजी कनेक्ट करत असताना अचानक पाईप बस्ट झाला. त्यामुळे मोठ्या सीएनजी गॅस बाहेर निघू लागला. मात्र सीएनजी ऑपरेटर व कर्मचाऱ्यांनी सीएनजीचे कनेक्शन बंद केले. त्यामुळे सीएनजी गळती थांबली. काही वेळा नंतर पुन्हा सीएनजी पंप सुरळीत झाला.