नाशिक – नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. खासकरुन जे दुचाकी वापरतात त्यांच्यासाठी. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी एक महत्त्वाचे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी येत्या भाऊबीजेपासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून होणार आहे. दुचाकी घेऊन तुम्ही पेट्र्रोल पंपच नाही तर ज्या कुठल्या सार्वजनिक ठिकाणी जाणार असाल तेथे हेल्मेट बंधनकारक असणार आहे. म्हणजेच, पोलिस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा, कॉलेज किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी आता तुम्हाला हेल्मेट घालावेच लागेल.
जर, तुमच्याकडे हेल्मेट नसेल तर थेट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हेल्मेटअभावी होणाऱ्या अपघाती मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांचे हे आदेश सर्व सार्वजनिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. त्याची कसोशीने अंमलबजावणी दिवाळीतच सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना दिवाळीचा मुहूर्त साधत तातडीने हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. तसेच, जे हेल्मेट वापरत नाहीत त्यांना आता त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. पोलिस आयुक्तांचे आदेश असे