शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या ‘त्या’ अहवालाकडे सगळ्यांचे लागले लक्ष; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 12, 2022 | 6:49 pm
in स्थानिक बातम्या
0
ZP Nashik 1 e1642158351239

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता विरुद्ध दोन आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्यातील वाद आता चिघळत चालल्याचे समोर येत आहे. कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिष्ठा या प्रकरणात पणाला लागली आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी सुरेन्द्र कंकरेज कामात दिरंगाई, कामे वाटपात होत असलेली अनियमिततेमुळे तत्कालीन सीईओ लीना बनसोड यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली होती. बांधकाम विभागाच्या कामांना स्थगिती देऊन कारणे दाखवा नोटिस बजावली होती. सात दिवसाच्या आत खुलासा देण्याचे सांगितले होते, मात्र बनसोड यांची बदली झाल्याने कंकरेज यांनी याकडे कानाडोळा केला. आता कंकरेज यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हे तिन्हीही आमदार पत्रव्यवहार करत आहे. मात्र, या पत्रव्यहाराला अधिकारी जुमानत नसल्याने या आमदारांनी वारिष्ठ पातळीवर धाव घेत कारवाईसाठी कंबर कसली आहे. कंकरेज यांच्या दिरंगाईमुळे मतदार संघातील कामांना स्थगिती मिळाल्याचा त्यांच्यावर आरोप असून याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कंकरेज यांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हे प्रकारणही मागे पडल्याने आमदारांनी थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. आमदार सुहास कांदे आणि हिरामण खोसकर यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट विधानसभेत तक्रार करण्याची भूमिका घेतली असून अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी केली आहे. पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या अधिकाऱ्यांची नाशिकच्या लोकप्रतिनिधी यांनी केलेली तक्रार बघता अद्यापही कारवाई होत नसल्याने कंकरेज यांच्यावर कुणाचा वरदहस्त अशी चर्चा सुरू झाली आहे. मतदार संघातील कंकरेज यांच्यामुळे कामे होऊ शकली नसून त्याचा फटका विकासावर बसल्याने आमदार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे तिन्ही आमदार विरुद्ध अधिकारी असा सामना सुरू असून चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Nashik ZP Report Chief Minister Decision
MLA Zilha Parishad

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

BCCIच्या विजय हजारे ट्रॉफी करिता सत्यजित बच्छाव यंदा देखील महाराष्ट्र संघात

Next Post

बिपाशा बसू आणि करण सिंग बनले आई-वडील; चाहत्यांना दिली गुडन्यूज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
Next Post
bipasha baby bump

बिपाशा बसू आणि करण सिंग बनले आई-वडील; चाहत्यांना दिली गुडन्यूज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011