शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

by India Darpan
जून 21, 2025 | 6:28 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : सातपूर मार्गावरील नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत जिल्हा परिषदेचे बहुतांश विभाग महिनाभरात म्हणजे जुलै अखेरिस हलवले जाणार आहेत. यामुळे रिकामी झालेली इमारत सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त कार्यालय व नाशिक महानगर प्राधिकरण यांना दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली. यामुळे अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद मुख्यालय नवीन इमारतीत जाण्याचे स्वप्न महिनाभरात प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेची सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्यामुळे २०१९ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या २५ कोटी खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीस राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर २०२० मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून जानेवारी २०२१ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला. दरम्यान काम सुरू केल्यानंतर नाशिक महापालिका व नगररचना विभागाच्या नियमानुसार इमारतीच्या बांधकामामध्ये काही बदल सुचवण्यास आले. यामुळे इमारतीच्या खर्चामध्ये वाढ होऊन तो ३९.६१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. सातपूर मार्गावर पशुसंवर्धन विभागाच्या जागेत या इमारतीच्या प्रस्तावित सहा मजल्यांपैकी सध्या दोन तळ मजले तीन मजले यांचे बांधकाम पूर्ण झाले असून तेथे फर्निचरचे काम सुरू आहे. दरम्यान या इमारतीच्या उर्वरित तीन मजल्यांच्या बांधकामासाठीही ग्रामविकास विभागाने ४१.६७ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता वर्षभरापूर्वी दिल्यानंतर त्याचेही बांधकाम अंतिम टप्प्यात असून पुढील चार पाच महिन्यांत ते काम पूर्ण होईल, असे नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान काम पूर्ण झालेल्या तीन मजल्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालये हलवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन सुरू केले असले तरी उर्वरित वरच्या तीन मजल्यांचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे नवीन इमारतीत कार्यालये हलवण्यात आलेली नाहीत. दरम्यान त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने सिंहस्थ प्राधिकरणची स्थापना केली असून विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची त्या प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळा आयुक्तपदी नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नेमणूक केली आहे. त्या सध्या महापालिका कार्यालयातून सिंहस्थ आयुक्तपदाचे कामकाज बघत असल्या तरी ती जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेचा शोध सुरू होता. दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या तीन मजल्यांवरील कार्यालये फर्निचरसह तयार झाले असून सध्या तेथे स्वच्छतेची कामे सुरू आहेत. यामुळे जिल्हा परिषदेची काही कार्यालये तेथे हलवून सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीत सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू होती. दरम्यान सिंहस्थ आयुक्त करिश्मा नायर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत येऊन कार्यालयांची पाहणी केली.
..
ही कार्यालये होणार स्थलांतरित
सातपूर मार्गावरील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत पहिल्या टप्प्यात म्हणजे जुलैअखेरीस मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा व वित्त विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग,पाणी पुरवठा व स्वच्छता, व महिला बालविकास विभाग स्थलांतरित केले जाणार आहेत. उरलेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकामचे तिन्ही विभाग, कृषी व पशुसंवर्धन विभाग, जलसंधारण विभाग हे दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित होतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली.
shaymugale74@gmail.com

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

Next Post

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011