गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यात साकारणार आदर्श गावांसह १०० मॉडेल स्कूल; असा आहे अॅक्शन प्लॅन

नोव्हेंबर 29, 2022 | 4:07 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221129 WA0044

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे समाजासाठी राबविले जाणारे उपक्रम आणि प्रकल्प भूषणावह आहेत. समाजाच्या विकासात रोटरी संस्थेचे कार्य अमुल्य असून, यापुढील काळात नाशिक जिल्हा परिषददेखील रोटरी संस्थेसोबत काम करेल. जिल्ह्यात लवकरच आदर्श गाव संकल्पना तसेच शंभर मॉडेल स्कूल विकसित करण्याचा आपला मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारा ‘उडान’ हा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रोटरी फौंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणारे प्रकल्प मॅग्नम हॉस्पिटलमधील ह्रदय शस्त्रक्रिया सुलभ करणारे कॅथलॅब आणि नेल्सन हॉस्पिटलच्या निओनेटल आयसीयू या प्रकल्प याविषयी माहिती देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मानद सदस्यत्व स्वीकारण्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.

या उपक्रमांमध्ये जटील शस्त्रक्रिया करण्यात येऊन अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. याशिवाय जळीत रुग्णांना वरदान ठरणारी स्किन बँक, शीत शवपेटीका, दीर्घकालीन आजारांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना मदत करणारी रोटरी रुग्ण साहित्य सेवा, थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम रोटरी शेतकरी बाजार, वात्सल्य मदर मिल्क बँक, आदिवासी गावात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची सोय करून देणारे लघु पाटबंधारे प्रकल्प, बिबट्याच्या दहशतीपासून बचाव करणारे सोलर स्ट्रीट लाईट, पर्यावरण रक्षण आणि आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणारे निर्धुर चूल वाटप अशा विविध प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे प्रथमच मांडण्यात आली.

प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रफुल बरडीया यांनी कार्यक्रम विषयीची भूमिका विशद केली. यावेळी प्रमुख पाहुणे तथा माजी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते देणगीदार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे डीस्ट्रीक सचिव रणजीत साळवी, सचिव ओमप्रकाश रावत यांच्यासह सीएसआर संचालक कमलाकर टाक, टीआरएफ संचालक सुधीर जोशी, मंथ लीडर विनीत कोटावर, अनुजा चौगुले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Nashik ZP Model Village and 100 Model School Plan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बानूबाईचे माहेर असलेल्या चंदनपुरी येथे चंपाषष्टी निमित भाविकांची दर्शनासाठी गर्दी (बघा व्हिडिओ)

Next Post

चक्क मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला कारसह पोलिसांनी उचलून नेले (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Capture 23

चक्क मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला कारसह पोलिसांनी उचलून नेले (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011