नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोक्यावर फेटा व मराठमोळ्या पध्दतीची नऊवारी साडी परिधान करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत वंदे मातरम् या गीतावर नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या नृत्याला दाद देत कौतुक केले. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. यावेळी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मित्तल यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी वंदे मातरम् या गीतावर नृत्य करत देशातील विविधतेत एकतेचे दर्शन घडवले.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1621793472788439040?t=cBTHzXQ_bMgtN3pqf4aq_Q&s=03
Nashik ZP CEO IAS Aashima Mittal Dance Video