शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी AI प्रशिक्षण कार्यक्रम…

by India Darpan
मार्च 24, 2025 | 8:53 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250324 WA0463 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद नाशिकमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत विशेष AI प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि प्रत्येक विभागातून दोन अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

AI तंत्रज्ञानाचा प्रशासनिक कामकाजात अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल, याबाबत कॉग्नीडॉल्फ प्रायव्हेट लिमिटेडचे मयूर तांबे व क्लाउडटेल्स लिमिटेडचे स्वप्नील बावा यांनी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान विविध AI ॲप्लिकेशन्सचा वापर, त्यांच्या कार्यप्रणाली आणि प्रत्यक्ष अमलात आणण्याच्या तंत्रांची माहिती देण्यात आली. यामुळे अधिकाऱ्यांना डिजिटल कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आगामी काळातील AI तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत प्रत्येक विभागातील तंत्रस्नेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे सांगितले. याचबरोबर, प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी भविष्यात जिल्हा स्तरावरील तसेच पंचायत समिती स्तरावरील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील, यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अधिक आधुनिक आणि परिणामकारक होईल, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल तसेच नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा देता येईल. AI चा वापर करून नोंदणी प्रक्रिया, अहवाल निर्मिती अन्य महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गती येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात अधिकाधिक अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रापमंचायत वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, पंकज मेतकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे उप कार्यकारी अभियंता अजित सूर्यवंशी, यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चैत्रोत्सव दरम्यान सप्तशृंगगड येथे जाणाऱ्या पायी दिंडी, पालखी समिती, मंडळ यांना ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक

Next Post

या व्यक्तींनी विनाकारण बडबड करू नये, जाणून घ्या, मंगळवार, २५ मार्चचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विनाकारण बडबड करू नये, जाणून घ्या, मंगळवार, २५ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011